जळगाव जनता सहकारी बँक भरती २०२५ : लिपिक पदासाठी सुवर्णसंधी jalgaon bank bharti

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

jalgaon Bank bharti : महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध प्रादेशिक बँक म्हणून ओळखली जाणारी आणि सर्व सामान्य माणसाचा आणि शेतकरी वर्गाचा विश्वास असलेली बँक जळगाव जनता सहकारी बँक लि, मध्ये नोकर भरती साठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे, खाली PDF जाहिरात दिली आहे व अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिली आहे व आवश्यक सर्व माहिती अतिशय सोप्याआणि सुटसुटीत भाषेत उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे अर्ज करू इच्छुणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात पूर्ण व काळजी पूर्वक वाचावी व नंतर आपली अर्ज प्रकिया पूर्ण करून घ्यावी.

jalgaon Bank bharti
jalgaon Bank bharti

jalgaon janata sahakari bank lid jalgaon officially announced hiring for various postion like clerk in dirrent branch which localated in Maharashtra state. Jalgaon Bank bharti 2025 is a good opportunity for those aspirants who want to work with the Bank and the local area. Below we have provided full information related to this vacancy along with the official Jahirat PDF and job application link. Please read carefully.

जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव (JJSBL) ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि प्रतिष्ठित शेड्यूल्ड सहकारी बँक आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असून, ४३ शाखांद्वारे बँकेचा सुमारे ३६०० कोटींचा व्यवसाय आहे. या बँकेने नुकतीच ‘लिपिक’ (Clerk) पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.

jalgaon Bank bharti

सदर jalgaon Bank bharti भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

🔴 भरती विभाग : जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव (Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., Jalgaon).

🔴 नोकरीचा प्रकार : ही भरती सहकारी बँकिंग क्षेत्रातील असून, हे पूर्णवेळ ‘लिपिक’ (Clerk) पद आहे.

🔴 एकूण पदे : जाहिरातीमध्ये पदांची निश्चित संख्या नमूद केलेली नाही. बँकेमध्ये रिक्त असलेल्या लिपिक पदांसाठी हे अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती ही बँकेच्या आवश्यकतेनुसार आणि अंतिम निवडीनुसार केली जाईल.

🔴 शैक्षणिक पात्रता : उमेदवार खालील अटींची पूर्तता करणारा असावा:

  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • उमेदवाराकडे MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे ज्ञान आवश्यक आहे.
  • विशेष प्राधान्य: ज्या उमेदवारांकडे बँकिंग क्षेत्राचा अनुभव आहे, मराठी/इंग्रजी टायपिंग येते, किंवा ज्यांनी JAIIB/CAIIB/GDC&A यांसारख्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाईल.

🔴 वेतनश्रेणी : बँकेच्या प्रचलित ‘कर्मचारी भरती व बढती’ धोरणानुसार आणि नियमांनुसार वेतन आणि भत्ते दिले जातील. जाहिरातीमध्ये विशिष्ट आकडा नमूद केलेला नाही.

🔴 अर्ज करण्याची पद्धती : अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. उमेदवारांनी http://sznsbal.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून अर्ज भरायचा आहे. पोस्टाने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

🔴 वयोमर्यादा : उमेदवाराचे वय जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवसापर्यंत २१ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.

🔴 अर्ज करण्यासाठी फिस : सदर परीक्षेसाठी परीक्षा शुल्क रु. ७२०/- + १८% जीएसटी + बँकेचे व्यवहार शुल्क (Applicable Bank Transaction Charges) असे राहील. हे शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे आणि ते ऑनलाईनच भरावे लागेल.

🔴 नोकरीचे ठिकाण : बँकेचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असून, बँकेच्या ४३ शाखा महाराष्ट्रभर पसरलेल्या आहेत. त्यामुळे नोकरीचे ठिकाण जळगाव किंवा बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणतीही शाखा असू शकते.

🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ डिसेंबर २०२५ (सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत) आहे. अर्जाची सुरुवात ७ डिसेंबर २०२५ पासून झाली आहे.

🔴 निवड प्रकिया : निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल:

  1. ऑनलाईन लेखी परीक्षा (९० गुण): ही परीक्षा बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाची असेल. यासाठी ९० मिनिटांचा वेळ असेल. अभ्यासक्रमामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टीट्यूड, रिझनिंग, गणित, मराठी व इंग्रजी व्याकरण, संगणक साक्षरता आणि बँकिंग विषयांचा समावेश असेल.
  2. तोंडी मुलाखत (१० गुण): लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची १० गुणांची मुलाखत घेतली जाईल.

महत्वाच्या सूचना:

उमेदवारांनी अर्ज भरताना स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही (JPEG फॉरमॅटमध्ये २० KB पर्यंत) स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच, परीक्षा प्रवेश पत्र (Hall Ticket) पोस्टाने पाठवले जाणार नाही, ते वेबसाईटवरूनच डाऊनलोड करावे लागेल.jalgaon Bank bharti ची जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली आहे.

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा 
मूळ जाहिरात (Notification PDF)PDF डाऊनलोड करा
आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा )सरकारी नोकरी

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.


माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Leave a Comment