वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२६: वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांची मेगा भरती ! Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत विविध रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Vasai Virar Municipal Corporation (VVMC) Recruitment 2026
Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026 VVMC bharti 2026

Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026 VVMC bharti 2026

महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या महानगरपालिका पैकी एक महानगरपालिका म्हणजे वसई विरार महागरपालिका मध्ये आरोग्य विभागात अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून विविध पदांच्या 132 जागा भरल्या जाणार असून ह्या पदांची भरती करण्यासाठी पदानुसार विविध शैक्षणिक पात्रता आहे, पदानुसार वेतन आणि अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

VVMC bharti 2026 : Vasai–Virar Municipal Corporation has officially announced a recruitment notification for hiring 132 health professionals for various positions in its municipal health facilities. The monthly pay scale ranges from INR 18,000 to INR 75,000. These positions are purely contractual for a period of 11 months from the date of joining. Interested candidates are advised to carefully read the official notification, understand the educational qualifications and eligibility criteria, and apply for the relevant position accordingly

पात्र उमेदवारांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. पदांनुसार थेट मुलाखत (Walk-in Interview) किंवा गुणवत्तेनुसार (Merit basis) निवड केली जाणार आहे.

हे ही वाचा.

भरतीचा थोडक्यात तपशील (Recruitment Overview)

विभागवैद्यकीय आरोग्य विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका
एकूण पदेविविध पदे (तपशील खाली पहा)
पदांची नावेबालरोग तज्ञ, एम.बी.बी.एस. डॉक्टर, स्टाफ नर्स, औषधनिर्माता, आरोग्य सेवक इ.
निवड प्रक्रियाथेट मुलाखत / गुणवत्ता यादी (Merit List)
मुलाखत दिनांक०२ फेब्रुवारी २०२६ ते ०६ फेब्रुवारी २०२६
अर्ज सादर करण्याची पद्धतप्रत्यक्ष (By Hand) किंवा टपालाने / कुरीयरने
अधिकृत वेबसाईटwww.vvcmc.in

रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता (Vacancy Details)

खालील तक्त्यात महत्त्वाच्या पदांची माहिती दिली आहे:

अ.क्र.पदाचे नावएकूण पदेशैक्षणिक पात्रतामानधन (प्रति महिना)
बालरोग तज्ञ०१MD Paed/ DCH/ DNB रु. ७५,०००/-
वैद्यकीय अधिकारी (MBBS)७१ (पूर्ण/अर्धवेळ)MBBS (MCI/MMC Registration) रु. ३०,००० ते ७५,०००/-
स्टाफ नर्स (GNM/B.Sc)१८GNM / B.Sc Nursing रु. २०,००० ते ३४,८००/-
औषधनिर्माता (Pharmacist)०२D.Pharma / B.Pharma रु. १७,००० ते २०,८००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३B.Sc with D.M.L.T. रु. १८,७००/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)३७१२ वी (सायन्स) + पॅरामेडिकल कोर्स रु. १८,०००/-

महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक (Important Dates)

  • थेट मुलाखतीसाठी (Medical Officers & Specialists):
    • दिनांक: ०२/०२/२०२६ ते ०६/०२/२०२६
    • वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:००
    • ठिकाण: वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, ७ वा मजला, विरार (प.)
  • इतर पदांसाठी अर्ज सादर करणे (Staff Nurse, Pharmacist, etc.):
    • मुदत: ०२/०२/२०२६ ते ०६/०२/२०२६ (सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत)
    • पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, विरार (प.)

वयोमर्यादा (Age Limit)

  • विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी: ७० वर्षांपर्यंत.
  • इतर पदे: खुला प्रवर्ग – ३८ वर्षे, राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे.

अर्ज कसा करावा? (How to Apply)

१. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरावा. २. अर्जासोबत सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे अनिवार्य आहे. ३. विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) जोडावे. ४. अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाने विहित मुदतीत पोहोचतील याची काळजी घ्यावी. ५. अर्जासोबत ‘लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र’ जोडणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी करा (Apply Online)येथे क्लिक करा
मूळ जाहिरात (Notification PDF)PDF जाहिरात
आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा )सरकारी नोकरी

महत्त्वाची टीप: उमेदवारांनी अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.

हे ही वाचा 📌


माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Leave a Comment