staff selection bharti 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3131 जागांसाठी भरती । जाहिरात । अर्ज करण्याची लिंक

staff selection bharti 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती जाहिरात प्रकाशित झाली असून. सदरील भरती मधून कनिष्ठ सेक्शन क्लर्क (एलडीसी) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (जेएसए), डेटा एंट्री ऑपरेटर (डीईओ) आणि डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘ए’ पदे. भरण्यात येणार आहेत. सदरील स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2025 ची अर्ज प्रकिया चालू झाली आहे.

Staff Selection Bharti 2025
Staff Selection Bharti 2025

Staff Selection Bharti 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ही भारत सरकारची एक संस्था आहे जी विविध केंद्रातील विविध मंत्रालये, विविध विभाग आणि त्यांच्याशी संबंधित कार्यालयांमध्ये गट ‘ब’ (अ राजपत्रित) आणि गट ‘क’ (गैर-तांत्रिक) पदांसाठी कर्मचार्‍यांची भरती करते. SSC च्या विविध परीक्षा असतात, जसे की CGL (Combined Graduate Level), CHSL (Combined Higher Secondary Level), MTS (Multi Tasking Staff), GD Constable इत्यादी. प्रत्येक परीक्षेसाठी निवड प्रक्रिया थोडी वेगळी असली तरी, साधारणपणे तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात आणि कागदपत्रे पडताळणी अशी निवड प्रकिया चालते. स्टाफ सिलेक्शन कमिशन Staff Selection Bharti 2025 अंतर्गत प्रकाशित झालेल्या जाहिरातीमधून अत्यंत महत्त्वाचे दोन पदे भरल्या जाणार आहेत. त्या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी , पद निहाय जागांची वर्गवारी , जाहिरात pdf मध्ये आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

पद निहाय जागांची माहिती

पदएकूण पदे
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)दोन्ही मिळून 3131 पदे
Staff Selection Bharti 2025 अंतर्गत जाहीर झालेल्या एकूण पदांमध्ये बदल होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट चेक करत राहावी लागेल. अधिकृत वेबसाइट ची लिंक खाली दिली आहे सोबत pdf जाहिरात सुद्धा दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Staff Selection Bharti 2025)

  • पद 1 – डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ : मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा समकक्ष संस्थेतून गणित विषय घेऊन विज्ञान शाखेतील १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • पद 2- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) :उमेदवारांने मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून 12 वी (बारावी) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. असे सर्व उमेदवार या पदासाठी पात्र असतील.

पदानुसार वेतनश्रेणी

  • कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) : Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).
  • Data Entry Operator (डेटा एंट्री ऑपरेटर ) (DEO): Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
  • Data Entry Operator (डेटा एंट्री ऑपरेटर ) , Grade ‘A’: Pay Level-4(Rs. 25,500-81,100)


महत्वाच्या लिंक

जाहिरात pdfClick Here
अधिकृत वेबसाइट ची लिंक Click Here
अर्ज करण्यासाठी लिंकClick Here

इतर महत्वाच्या बाबी

  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :-  18 जुलै 2025 (रात्री 11:00 pm ) (अर्जात सुधारणा करण्यासाठी एक दिवस वाढीव वेळ दिला आहे. )
  • वयाची अट : (01 जानेवारी 2026 रोजी ) सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 27 वर्ष , अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्ष सूट , ओबीसी 03 वर्ष सूट
  • परीक्षा फीस : सर्वसाधारण प्रवर्ग आणि ओबीसी: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: कोणतेही फी नाही]
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ISRO इसरो मध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी |जाहिरात प्रकाशित झाली एकूण जागा |pdf जाहिरात | अर्ज करण्याची लिंक |isro recruitment 2025

निवड प्रकिया

SSC च्या निवड प्रक्रियेमध्ये विविध परीक्षेचे टप्प्यांचा समावेश आहे, ज्यात प्रामुख्याने टियर-1 ही एक ऑनलाइन, संगणक-आधारित परीक्षा असते ज्यात सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरूकता, संख्यात्मक योग्यता आणि इंग्रजी आकलन या चार विषयांवर प्रश्न भर दिल्या जातो, आणि ही परीक्षा पात्रता किंवा गुणानुक्रम ठरवणारी असू शकते. टियर-1 मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना टियर-2 ही परीक्षा द्यावे लागते, ही परीक्षा सुद्धा ऑनलाइन असते जी संगणक-आधारित परीक्षा असून यात (उदा. CGL साठी गणिते, इंग्रजी, सांख्यिकी) आणि काही पदांसाठी निबंध व पत्रलेखन असलेला वर्णनात्मक प्रश्न विचारले जाऊ शकतात, याव्यतिरिक्त, काही पदांसाठी टियर-3 मध्ये कौशल्य चाचणी (जसे की टायपिंग टेस्ट) सर्व परीक्षा टप्प्यांमध्ये यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी (DV) बोलावले जाते, जिथे त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक मूळ कागदपत्रे तपासली जातात. शेवटी, सर्व टप्प्यांतील उमेदवारांच्या कामगिरीवर आणि उपलब्ध रिक्त जागांवर आधारित अंतिम निवड यादी (Final Selection List) तयार केली जाते, ज्यात नाव असलेल्या उमेदवारांची संबंधित पदासाठी निवड केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top