जर तुम्ही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने Employees’ Provident Fund Organisation (EPFO) अंतर्गत दोन महत्त्वाच्या पदांसाठी विशेष भरती जाहिरात क्र. 52/2025 प्रकाशित केली आहे. ही भरती Enforcement Officer/Accounts Officer (EO/AO) आणि Assistant Provident Fund Commissioner (APFC) या पदांसाठी आहे.

पदसंख्या व आरक्षण:
| क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा (UR) | वेतनश्रेणी (7th CPC) | पदाचा प्रकार |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | Enforcement Officer / Accounts Officer (EO/AO) | 156 | कोणत्याही विषयात पदवी | 30 वर्षे | Level 8 (₹47,600 – ₹1,51,100) | ग्रुप ‘B’, कायमस्वरूपी |
| 2 | Assistant Provident Fund Commissioner (APFC) | 74 | पदवी (इच्छित: Company Law / Labour Law डिप्लोमा) | 35 वर्षे | Level 10 (₹56,100 – ₹1,77,500) | ग्रुप ‘A’, कायमस्वरूपी |
टीप: OBC, SC/ST, PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठी जागा राखीव:
- Enforcement Officer पदासाठी 9 जागा.
- Assistant PF Commissioner पदासाठी 3 जागा.
मुख्यालय: दोन्ही पदांसाठी मुख्यालय नवी दिल्ली असून संपूर्ण भारतात पोस्टिंग होऊ शकते.
परीक्षा केंद्रे: भरती परीक्षा संपूर्ण भारतातील 78 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. (पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, नवी मुंबई यांचा समावेश)
आवश्यक कागदपत्रे :
- जन्मतारखेचा पुरावा (10वी प्रमाणपत्र)
- पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
- EWS प्रमाणपत्र (EWS साठी)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD साठी)
अधिकृत वेबसाईट: https://upsconline.nic.in
अर्ज प्रक्रिया कशी करावी?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्ही एकदा “One-Time Registration” करावी लागेल. ही नोंदणी एकदाच केली जाते आणि ती पुढील सर्व UPSC परीक्षांसाठी वैध असते.
नोंदणी झाल्यावर, उमेदवाराने भरतीसाठी लागणारी सगळी माहिती काळजीपूर्वक भरावी. त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव (जर असेल तर), ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यांचा समावेश असतो. अर्जात फोटो आणि सही यांचे स्कॅन केलेले नमुने सुद्धा अपलोड करावे लागतात. यासाठी UPSC ने विशिष्ट फॉरमॅट दिला आहे, त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
अर्ज करताना शुल्क देखील भरावे लागते. जर तुम्ही एका पदासाठी अर्ज करत असाल, तर पंचवीस रुपये शुल्क लागेल. आणि जर तुम्ही दोन्ही पदांसाठी अर्ज करत असाल, तर पन्नास रुपये भरावे लागतील. मात्र, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. शुल्क इंटरनेट बँकिंग, UPI किंवा डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे सहज भरता येते.
अर्ज पूर्ण भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे. ही प्रिंट तुम्हाला नंतर मुलाखतीसाठी नेऊन दाखवावी लागते. अर्ज सबमिट केल्यानंतर तो मागे घेता येत नाही, त्यामुळे सगळी माहिती नीट तपासूनच अंतिम सबमिशन करावे.
सर्व अर्जदारांना UPSC कडून सर्व प्रकारची माहिती ईमेलद्वारे दिली जाईल, त्यामुळे अर्ज करताना जो ईमेल आयडी तुम्ही देता, तो चालू व अचूक असणे खूप गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply): UPSC EPFO भरती 2025 साठी अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. खाली प्रक्रिया दिली आहे:
- https://upsconline.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- जर तुम्ही पहिल्यांदा UPSC साठी अर्ज करत असाल, तर प्रथम One-Time Registration (URN) करणे आवश्यक आहे. ही नोंदणी आयुष्यभरासाठी वैध असते.
- योग्य ईमेल आयडी व मोबाईल नंबर वापरून फॉर्म भरा.
- तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव (असल्यास), ओळखपत्र याची माहिती द्या.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करा (साइटवरील फॉरमॅटप्रमाणे).
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| सामान्य / OBC / EWS | ₹25 (एक पदासाठी) / ₹50 (दोन्ही पदांसाठी) |
| महिला / SC / ST / PwBD | ₹0 (माफ) |
- शुल्क UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा SBI च्या कोणत्याही शाखेतून भरता येईल.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा.
- सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा. ही मुलाखतीसाठी आवश्यक आहे.
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज सबमिट झाल्यानंतर माघार घेता येत नाही.
- सर्व माहिती बरोबर, संपूर्ण व प्रमाणित असावी.
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- मुलाखतीसाठी बोलावल्यास मूळ कागदपत्रे व त्यांचे स्वयंप्रमाणित प्रती सादर करणे आवश्यक आहे.
- सर्व संपर्क ईमेलद्वारे केला जाईल. त्यामुळे योग्य आणि चालू ईमेल द्यावा.
भरती प्रक्रिया संपूर्ण माहिती:
UPSC मार्फत होणाऱ्या EPFO भरतीसाठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यांमधून केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ताधारित आहे.
सर्वप्रथम, उमेदवारांना संयुक्त भरती परीक्षा म्हणजेच Computer-Based Test (CBT) द्यावी लागेल. ही परीक्षा दोन तासांची असेल आणि त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे म्हणजेच Multiple Choice प्रश्न असतील. परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल. मात्र, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी काही गुण वजा केले जातील, म्हणून सावधगिरीने उत्तर देणे महत्त्वाचे आहे.
या परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न खालील विषयांशी संबंधित असतील. त्यामध्ये इंग्रजी भाषेची समज, भारताचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ आणि वारसा, सध्याचे आर्थिक प्रश्न आणि भारताची राज्यघटना यांचा समावेश असेल. त्याशिवाय, सामान्य विज्ञान, संगणकाची मूलभूत माहिती, गणित आणि आकडेमोड, मानसिक क्षमता, कामगार कायदे, सामाजिक सुरक्षा, लेखा आणि विमा यांसारख्या महत्वाच्या विषयांवर प्रश्न असतील. तसेच, देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी यांचाही अभ्यास गरजेचा आहे.
या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना नंतर UPSC मुलाखतीसाठी बोलावेल. त्या मुलाखतीमध्ये उमेदवाराचे ज्ञान, आकलनशक्ती, संवाद कौशल्य आणि प्रशासनिक क्षमतांचा विचार केला जाईल.
या संपूर्ण भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यातील परीक्षेला 75 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीला 25 टक्के गुणवेटेज असेल. या दोन्ही टप्प्यांमधील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |