sbi bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील स्थानिक उमेदवारांसाठी हि सुवर्ण संधी असून स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सार्वजिनक बँक मध्ये सम्पूर्ण देशात मोठी भरती जाहीर झाली असून महाराष्ट्र राज्यात ५०० पेक्षा अधिक पदे भरले जाणार आहेत. या लेखात जाहिरातीविषयी माहिती , अधिकृत जाहिरात लिंक , अर्ज करण्याची लिंक सोबत शैक्षणिक पात्रता , व निवड प्रकिया नेमकी कशी होणार आहे या विषयी सविस्तर माहिती लेखात दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.
sbi bharti 2025 : This is a golden opportunity for local candidates of Maharashtra. The State Bank of India, the largest public sector bank in the country, has announced large-scale recruitment across India. In Maharashtra alone, more than 500 positions will be filled. In this article, we provide detailed information about the official notification, application link, educational qualifications, selection process, and other important details. Read the full article to get complete information

📌महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात जी खाली PDF मध्ये दिली आहे ती काळजीपूर्वक वाचन करावी आणि आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुम्ही कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे . 📌
भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया sbi bharti 2025 |
भरती पदाचे नाव | JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) |
भरण्यात येणारी पदे | ४९० एकूण पदे (मराठी- 476 आणि कोकणी १४ ) |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील काही निवडक जिल्हे |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही शाखेची पदवी ( स्थानिक भाषा (मराठी, कोकणी ) अवगत असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. |
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा | २० ते २८ (आरक्षण नुसार सूट कृपया अधिकृत जाहिरात वाचावी ) |
हे पण वाचा
✅MPSC, Banking आणि SSC ची तयारी एकत्र कशी करावी? एकत्रित अभ्यासाचं योग्य नियोजन!MPSC, Banking आणि SSC ची तयारी एकत्र कशी करावी? एकत्रित अभ्यासाचं योग्य नियोजन!
✅कॉलर जॉब म्हणजे काय? प्रकार, महत्व आणि संपूर्ण माहिती मराठीत!
निवड प्रकिया sbi bharti 2025
sbi bharti 2025 अधिकृत जाहिरातीमध्ये निवड प्रकिया थोड्यासी किचकट भाषेमध्ये नमूद केली असून आम्ही इथे सध्या आणि सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे.
एकदा का उमेदवाराने आपली online अर्ज प्रकिया पूर्ण केली कि त्यांच्या अधिकृत आणि नोंदणीकृत मेल आयडी वर परीक्षेचे अपेक्षित वेळापत्रक येईल. sbi bharti 2025 या भारतीअंतर्गत उमेदवारांची निवड करताना प्राथमिक , मुख्य परीक्षा आणि तोंडी मुलाखत (भाषा या विषयवार ) अश्या तीन मुख्य टप्पात पार पडते.
📙 प्राथमिक परीक्षा – हि परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून सदरील परीक्षा एकूण १०० गुणांची असेल ज्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी -३० प्रश्न, ३० मार्कांसाठी , संख्यात्मक क्षमता ३५ प्रश्न, ३५ मार्कांसाठी आणि रीजनिंग ३५ प्रश्न ३५ मार्कसाठी.
📙 जे उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र त्या उमेदवारांसाठी २०० गुणांची मुख्य परीक्षेचे आयोजन विभागामार्फ़त करण्यात येणार आहे . या परीक्षेसाठी २तास ४० मिनिटाचा वेळ असेल आणि परीक्षेमध्ये प्रामुख्याने सामान्य / आर्थिक जागरूकता 50 प्रश्न 50 गुण,तर्कक्षमता आणि संगणक अभियोग्यता-50प्रश्न 60 गुण ,सामान्य इंग्रजी इंग्रजी ४०प्रश्न ४० गुण ,क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड 50प्रश्न 60 गुण या विषयवार भर देण्यात येईल . मुख्य परीक्षा या निवड प्रकियेमधील महत्वाचा टप्पा असून तो अंतिम टप्पा नाहीये हे लक्षात घेणे गरजेचे आहे करणं जे उमेदवार मुख्य परीक्षा पात्र होतील त्यांना तोंडी परीक्षेस सामोरे जायचे आहे .
📙प्राथमिक आणि मुख्य परीक्षा मधून ज्या उमेदवार भाषा चाचणी (तोंडी मुलाखतीसाठी ) पात्र झाले असतील आणि त्यांच्या इयत्ता १० वि किंवा १२ च्या मार्कमेमो आणि सनद वर स्थानिक भाषा उत्तीर्ण असल्याचा उल्लेख असल्यास त्यांना भाषा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही .
प्राथमिक आणि मुख्य परीक्षांसाठी महाराष्ट्र राज्यातील काही निवडक ठिकाण ज्या ठिकाणी विभाग परीक्षा केंद्र देणार आहे – अहिल्यानगर(अहमदनगर), अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
ह्या जाहिराती सुद्धा वाचा