Central Bank of India Bharti 2025|सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५०० शिकाऊ पदांसाठी मेगा भरती २०२५: पदवीधरांना सुवर्णसंधी

Central Bank of India Bharti 2025 : सेंटल बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून बँक मध्ये एकूण 4500 पदांची नेमणूक होणार असून इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून आपली पात्रता तपासणे आणि अर्ज प्रकिया पूर्ण करू शकतात. खाली जाहिरात pdf मध्ये उपलब्ध असून अर्ज करण्याची लिंक सुद्धा देलेली आहे. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

Central Bank of India Bharti 2025
Central Bank of India Bharti 2025

Table of Contents

Central Bank of India Bharti 2025

ट्रल बँक ऑफ इंडियाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी शिकाऊ (Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. देशभरात एकूण ४५०० पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, पदवीधर तरुणांना बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. शिकाऊ कायदा, १९६१ अंतर्गत ही भरती होत आहे. ज्या तरुण -तरुणी यांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पूर्ण केले आहे किंवा ते पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ते सर्व उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पदांचा तपशील

पद क्र पदाचे नाव पद संख्या
1 अप्रेंटिस (Apprentice)4500
Total4500

पात्रता निकष

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील पात्रता निकष पूर्ण करणे गरजेच आहे, त्यासाठी खालील माहिती समजून घेणे आवश्यक आहे.

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. BA, BSC, Bcom, BCA अशी कोणताही क्षेत्रातील पदवी पूर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा (३१ मे २०२५ पर्यन्त )
    • किमान वय: २० वर्षे ( कमीत कमी )
    • कमाल वय: २८ वर्षे ( जास्तीत जास्त )
    • राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC/PwBD) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 5 वर्ष आरक्षण नुसार सवलत.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : ७ जून २०२५
  • ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : २३ जून २०२५
  • अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख : २५ जून २०२५
  • ऑनलाइन परीक्षेची अंदाजित तारीख : जुलै २०२५ चा पहिला आठवडा

निवड कशी होते

अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची निवड दोन टप्यात पूर्ण होते.

  1. ऑनलाइन लेखी परीक्षा : ही परीक्षा ‘बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्र कौशल्य परिषद’ (BFSI Sector Skill Council of India – BFSI SSC) द्वारे आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रकारचे १०० प्रश्न जातील, ज्यासाठी एकूण १०० गुण असतील. विशेष म्हणजे, या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण (Negative Marking) नसतील. त्यामुळे याची उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
  2. स्थानिक भाषा चाचणी : ऑनलाइन परीक्षेत यशस्वी/पास झालेल्या उमेदवारांना त्यांनी अर्ज केलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेची बँक मार्फत परीक्षा होईल. अंतिम निवड यादी दोन्ही टप्प्यांमधील परीक्षेतिल पडलेल्या गुणांच्या आधारे तयार करून प्रकाशित करण्यात येईल.

विद्यावेतन (Stipend) किती मिळेल

उमेदवारांना प्रशिक्षणाच्या कालावधीत दरमहा ₹१५,००० इतके विद्यावेतन (Stipend) मिळणार आहे.

अर्ज करण्याची फीस (Fees)

  • PwBD (दिव्यांग) उमेदवार: ₹४०० + १८% GST
  • SC/ST/EWS/महिला उमेदवार: ₹६०० + १८% GST
  • इतर सर्व उमेदवार: ₹८०० + १८% GST
Important Linksमहत्वाच्या लिंक
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज साठी Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Suniel G

I’m Sunil Ghodke, a blog writer with a deep understanding of government job recruitment, honed over 6 years of collaboration with Maharashtra government departments. My blog is your go-to resource for Central and Maharashtra State Government job updates, offering clear insights into eligibility, selection processes, and official notifications. My mission is to empower job seekers with accurate, timely information to navigate the Sarkari Naukri landscape confidently and efficiently.

Leave a Reply