icg assistant commandant notification 2025 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard – ICG) हे भारताचे एक सागरी सशस्त्र दल आहे जे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असून , जे देशाच्या सागरी हितांचे रक्षण करते. १९७८ मध्ये तटरक्षक अधिनियम, १९७८ नुसार याची स्थापना करण्यात आली होती आणि हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. याच भारतीय तटरक्षक दलात नोकर भरती जाहिरात प्रकाशित झाली असून एकूण 170 पदे भरण्यात येणार आहेत. भारतीय तटरक्षक दलात नोकरी करू इच्चुणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी हि सुवर्ण संधी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज करावा.

icg assistant commandant notification 2025
भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard – ICG) हे भारतीय सुरक्षा दलातील एक अतिशय महत्वाचे दल असून या दलामध्ये नोकर भरती दर वर्षी प्रकाशित होत असते. जुलै २०२५ मध्ये विविध पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मधून असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) ,असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) हि दोन अत्यंत महत्वाची पदे भरले जाणार आहेत. पदानुसार शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , अधिकृत जाहिरात PDF, अर्ज करण्याची परकीय , आवश्यक कागदपत्रे , अधिकृत वेबसाईट ची लिंक या विषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा.
The Indian Coast Guard (ICG) is a crucial component of India’s security forces, and recruitment notifications for this force are published annually. In July 2025, advertisements for various posts have been released, through which two highly significant positions—Assistant Commandant – General Duty (GD) and Assistant Commandant – Technical (Mechanical/Electrical/Electronics)—will be filled. Detailed information regarding educational qualifications, job location, official advertisement PDF, application process, required documents, and the official website link is provided below, so please read the information thoroughly until the end.
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) | 140 |
| 2 | असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics) | 30 |
| Total | 170 |
Icg assistant commandant notification 2025 pdf download
- भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल Indian Coast Guard – ICG
- एकूण पदे : 170
- शैक्षणिक पात्रता : पद क्र. १ – पदवीधर , पद क्र २- 12वी (Maths & Physics )या विषयातून उतीर्ण असणे अनिवार्य
- वेतनश्रेणी : 7 व्या वेतन आयोगानुसार जवळपास 56,100/- मासिक वेतन
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रकिया चालू झाली असून अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- वयोमर्यादा : ०१ जुलै २०२६ रोजी २१ ते २५ वर्षांदरम्यान असावे, म्हणजेच अर्जदार उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००१ ते ३० जून २००५ या कालावधीत झालेला असावा. तटरक्षक दल किंवा लष्कर/नौदल/वायुदलात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
- त्याचबरोबर अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती SC/ST यांच्या साठी ५ वर्ष सूट आणि इतर मागासवर्गीय OBC यांना ३ वर्षी सूट
- अर्ज करण्यासाठी फिस : सामान्य आणि OBC प्रवर्गातून अर्ज करण्याऱ्या अर्जदार 300 रुपये फीस , SC/ST उमेदवारांना कोणतीही फीस नाही.
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतातील सागरी तटरक्षक दलाचे कार्यलय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2025 (11:30 PM)
- परीक्षा :- सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026
Icg assistant commandant notification 2025 apply online
निवड प्रकिया
भारतीय तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडंट पदांसाठी निवड प्रक्रिया अखिल भारतीय गुणवत्ता यादीवर आधारित आहे, जी उमेदवारांच्या पाच टप्प्यांतील (टप्पा I ते V) कामगिरीवर आणि उपलब्ध जागांवर अवलंबून असते. प्रत्येक टप्पा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. प्रथम टप्पा-I मध्ये CGCAT (Coast Guard Common Admission Test) ही ऑनलाइन चाचणी घेतली जाते, ज्यात १०० बहुपर्यायी प्रश्न असून नकारात्मक गुण पद्धती लागू आहे. या चाचणीच्या गुणांवर (नॉर्मलायझेशनसह) गुणवत्ता यादी तयार होते. टप्पा-II मध्ये प्राथमिक निवड मंडळ (PSB) असते, ज्यामध्ये CCBT (Computerised Cognitive Battery Test) आणि PP&DT (Picture Perception & Discussion Test) या पात्रता स्वरूपाच्या चाचण्या होतात, तसेच बायोमेट्रिक आणि कागदपत्र पडताळणी केली जाते. टप्पा-II नंतर टप्पा-III मध्ये अंतिम निवड मंडळ (FSB) असते, जिथे मानसशास्त्रीय चाचणी, गट कार्य आणि मुलाखत घेतली जाते. टप्पा-IV मध्ये वैद्यकीय तपासणी होते, जिथे अपात्र उमेदवारांना अपीलाची संधी मिळते. शेवटी, टप्पा-V मध्ये टप्पा-IV उत्तीर्ण झालेल्या आणि अखिल भारतीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड होते, जी टप्पा-I आणि टप्पा-III च्या एकत्रित गुणांवर आधारित आहे. प्रत्येक टप्प्याचे निकाल ICG च्या वेबसाइटवर उमेदवाराच्या लॉगिनद्वारे जाहीर केले जातात.
| Important Links महत्वाच्या लिंक | |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| सरकारी नोकरी ग्रुप | सरकारी -नोकरी |
- लातूर आरोग्य विभाग नगरपालिका मध्ये विविध पदांची भरती latur nuhm bharti 2025
- MPSC मार्फत तंत्र शिक्षण विभागात गट अ पदांची पद भरती जाहिरात प्रकाशित|mpsc recruitment| अर्ज प्रकिया चालू
- प्रसार भरती मध्ये नोकरीची संधी : Prasar Bharati Bharti 2025 : pdf जाहिरात |अर्ज करण्याची लिंक