इंडियन बँक भरती : इंडियन बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली सरकारी खूप मोठी आणि जुनी बँक असून देशातील सर्व राज्यात जवळपास 6000 शाखा आहेत. याच इंडियन बँक मध्ये दर वर्षी अनेक अनेक पदांची भरती होत असते, या वर्षी 2025 मध्ये इंडियन बँक भरती जाहिरात प्रकाशित केली असून या जाहिरातीमधून एकूण 1500 जागा भरणार आहेत या नोकर भरती विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यामध्ये नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, भरती प्रकिया , वेतन , वयोमर्यादा , अर्ज करण्याची शेवटची तारीख विषयी माहिती दिली आहे सोबतच भरतीची अधिकृत जाहिरात pdf मध्ये , अधिकृत वेबसाइट ची लिंक , आणि अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यामुळे माहिती शेवट पर्यन्त वाचा

इंडियन बँक भरती
Indian Bank, a very large and old government-owned public sector bank in India, has nearly 6000 branches across all states. Every year, Indian Bank recruits for numerous positions, and for the year 2025, they have published a recruitment advertisement to fill a total of 1500 vacancies. Comprehensive information regarding this recruitment drive is provided below, including details on job location, educational qualifications, application procedure, recruitment process, salary, age limit, and the last date to apply. Additionally, the official recruitment advertisement in PDF format, the official website link, and the application link are also included, so please read the information completely.
📣 महत्वाची सूचना : अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी
.📣
- भरती विभाग : सदरील भरती इंडियन बँक मार्फत केली जात आहे.
- एकूण पदे : 1500 अप्रेंटिस
- नोकरीचा प्रकार : अप्रेंटिस करार तत्वावर 6 महीने ते 36 महिन्यापर्यंत अशू शकतो.
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी.
- वेतनश्रेणी : महानगर पालिका आणि शहरी शाखेमध्ये 15000 रुपये आणि ग्रामीण भागातील शाखेमध्ये 12000 रुपये ठोक विद्यावेतन दिले जाईल.
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन
- वयोमर्यादा : सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष वयोमर्यादा आहे, अनुसूचित जाती जमाती SC/ST साठी 5 वर्ष , OBC साठी 3 वर्ष , दिव्यांग साठी 10 वर्ष सूट देण्यात आली आहे.
- अर्ज करण्यासाठी फिस : General/OBC/EWS: ₹800/- [SC/ST/PWD: ₹175/-]
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत ( महाराष्ट्र राज्यात किती जागा आहेत त्यासाठी जाहिरात pdf वाचा खाली दिली आहे. )
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2025
निवड प्रकिया
ऑनलाइन पद्धतीने पात्र झालेल्या अर्जापैकी अर्जाची इंडियन बँक अप्रेंटिस भरती २०२५ निकष आणि नियमाप्रमाणे अर्जाची छाननी होते त्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी बोलावले जाते. सदरील परीक्षेत सामान्यतः संख्यात्मक योग्यता (Quantitative Aptitude), तर्कक्षमता (Reasoning Ability), इंग्रजी भाषा आणि सामान्य जागरूकता (General Awareness) यांसारख्या विषयांचा समावेश केला जाऊ शकतो. ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी निवडले केली जाते, ज्यात त्यांच्या स्थानिक भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते. या दोन्ही टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड यादी प्रकाशित केली जाते.शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत (३ वर्षांपर्यंत) असू शकतो. काही विशिष्ट ट्रेडमध्ये हा कालावधी ४ वर्षांपर्यंत देखील वाढू शकतो. याची उमेदवारांनी दखल घ्यावी.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |